Tuesday, 31 March 2020

शिवविचार प्रतिष्ठान

१ एप्रिल १६७३
मराठ्यांनी परळीचा किल्ला जिंकला.  पुढे शिवरायांनी आपल्या सद्गुरूस अर्थात समर्थ रामदास स्वामी महाराजांना या गडावर आदरपूर्वक बोलवून घेतले व गडाचे नाव ठेवले सज्जनगड.  सज्जनगडाच्या पायथ्याला परळी नावाचे गाव आहे. या गावावरूनच किल्ल्याचे नाव परळी असे पडले. या गावात २ अतिशय जीर्ण अशी मंदीरे आहेत. सुरेख. पण औरंगजेबाच्या हल्ल्यात त्या मंदीरांना उपद्रव झालेला आहे. मुंडी छाटलेला नंदी अजूनही मंदीरा समोर उभा आहे. पुर्वी अश्वलायन ऋषींनी या डोंगरावर तपश्चर्या केलेली होती. म्हणून डोंगराचे नाव पडले अश्वलायन दुर्ग मग या परळी गावावरून डोंगराचे नाव पडले परळीचा किल्ला। . मग छत्रपती शिवाजी महाराजांनी नाव ठेवले सज्जनगड. मग औरंगजेबाने जेंव्हा किल्ला जिंकला तेंव्हा त्याने नाव ठेवले ‘नवरसतारा’ पुन्हा मराठ्यांनी हा किल्ला जिंकून किल्ल्याचा ‘सज्जनगड’ म्हणून नामकरण विधी केला.

Monday, 30 March 2020


३१ मार्च १६६५

मिर्झा राजे जयसिंह व दिलेरखान पठाण पुरंदरच्या पायथ्याशी येऊन
दाखल. इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा वेढा सुरु. औरंगजेब बादशाहाच्या
फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या, तेव्हा बादशाहावर जबर
बसण्यासाठी शिवरायांनी खूप सधन सुरतेवर छापा घालून लक्षावधी
रुपयांची लुट मिळवली. औरंगजेब बादशाहाच्या सुरतेची शिवरायांनी
बेसुरत केली.त्यामुळे बादशाहा भयंकर चिडला होता.मराठ्यांचे राज्य
नष्ट करण्याचा त्याने निश्चय केला.मिझाराजे जयसिंग या आपल्या
बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले.त्याच्या सोबतीला
दिलेरखान हा आपला विश्वासू सरदार दिला.अलोट खजिना आणि
अफाट दारूगोळाही बरोबर दिला. #Ek_aathavan_shivrayanchi जयसिंग आणि दिलेरखान प्रचंड
फौजेसह दक्षिणेत येऊन पोहचले.स्वराज्यावर फार मोठे संकट आले.
पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता.हा किल्ला
घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही,हे दिलेरखान
जाणून होता.त्यामुळे दिलेरखानाने पुरंदरला
वेढा दिला.
🚩 *शिवविचार प्रतिष्ठान*🚩
३० मार्च इ.स.१६४५
नरसप्रभू देशपांडेंना आदिलशाही सुभेदाराचे धमकीवजा पत्र वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ वाहिली, रोहीडे व वेळवंड खोरे येथील देशपांडे, कुलकर्णी, दादाजी नरसप्रभू हे महाराजांच्या सोबत होते असे काही वतनदारांकडून कळल्यावर आदिलशहाच्या शिरवळ येथील सुभेदाराने त्यांना ३० मार्च १६४५ रोजी धमकीवजा पत्र पाठवले, या पत्रात दादाजी चिंतेत आहे हे कळताच राजांनी खालील पत्र पाठवले, " हे स्वराज्य व्हावे हि तो श्रींची इच्छा आहे " आपण सुरु केलेले कार्य हे ईश्वरी इच्छेनुसार आहे, हि धारणा त्यांनी या पत्रातून व्यक्त करून मनोबल वाढवले.
३० मार्च इ.स.१६५६
छत्रपती शिवराय 'जावळी' येथून रायरीकडे रवाना झाले.
३० मार्च इ.स.१६६५
मुघल सरदार 'मिर्झाराजे जयसिंग' आपल्या फोजेसह पुन्हा सासवडला आले.
३० मार्च इ.स.१७२९
मराठ्यांनी थोरले बाजीरावच्या नेतृत्वाखाली जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.
३० मार्च इ.स.१७५७
प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.