Tuesday, 31 March 2020

शिवविचार प्रतिष्ठान

१ एप्रिल १६७३
मराठ्यांनी परळीचा किल्ला जिंकला.  पुढे शिवरायांनी आपल्या सद्गुरूस अर्थात समर्थ रामदास स्वामी महाराजांना या गडावर आदरपूर्वक बोलवून घेतले व गडाचे नाव ठेवले सज्जनगड.  सज्जनगडाच्या पायथ्याला परळी नावाचे गाव आहे. या गावावरूनच किल्ल्याचे नाव परळी असे पडले. या गावात २ अतिशय जीर्ण अशी मंदीरे आहेत. सुरेख. पण औरंगजेबाच्या हल्ल्यात त्या मंदीरांना उपद्रव झालेला आहे. मुंडी छाटलेला नंदी अजूनही मंदीरा समोर उभा आहे. पुर्वी अश्वलायन ऋषींनी या डोंगरावर तपश्चर्या केलेली होती. म्हणून डोंगराचे नाव पडले अश्वलायन दुर्ग मग या परळी गावावरून डोंगराचे नाव पडले परळीचा किल्ला। . मग छत्रपती शिवाजी महाराजांनी नाव ठेवले सज्जनगड. मग औरंगजेबाने जेंव्हा किल्ला जिंकला तेंव्हा त्याने नाव ठेवले ‘नवरसतारा’ पुन्हा मराठ्यांनी हा किल्ला जिंकून किल्ल्याचा ‘सज्जनगड’ म्हणून नामकरण विधी केला.

No comments:

Post a Comment