Monday, 18 May 2020

🚩शिवविचार प्रतिष्ठान🚩
१९ मे इ.स.१६७३ 

शिवरायांची स्वतःवर कृपादृष्टी व्हावी म्हणुन इंग्रजांनी थॉमस निकल्स या इंग्रज अधिकार्याला योग्य त्या सुचना व सोबत मोठा नजराणा देवुन मुंबईहून किल्ले रायगडावर रवाना केले
१९ मे इ.स.१६७४
छत्रपती शिवराय किल्ले रायगडहून किल्ले प्रतापगडकडे निघाले. प्रतापगडावर महाराज ३ दिवस मुक्कामी राहीले. येत्या काही दिवसातच शिवरायांचा राजाभिषेक सोहळा किल्ले रायगडवर पार पडणार होता, तत्पूर्वी त्यांनी प्रतापगडावरील आदीशक्ती तुळजा भवानी देवीला १.२५मण वजनाचे छत्रचामर अर्पण केले आणि मातेसमोर मंगलकलश प्रस्थापित केला.

No comments:

Post a Comment