Sunday, 17 May 2020


स्वराज्याचे
मराठा साम्राज्यात रुपांतर करणारे
कुशल प्रशासक
शंभूपुत्र
स्वराज्याचे चौथे छत्रपती
थोरले शाहू महाराज भोसले
जयंती निमित्त महाराजांना त्रिवार
मानाचा मुजरा..🚩
शिवविचार प्रतिष्ठान
१८ मे इ.स.१६५९

छत्रपती शिवाजी महाराजांनी बजाजी निंबाळकराची अफजलखानाच्या कैदेतून सुटका केली.
१८ मे इ.स.१६७५
मराठ्यांनी "कारवार" जिंकले.
१८ मे इ.स.१६८२
"शंभुराजांना" महाराणी येसुबाई यांना पोटी  'गंगोली' येथे पुत्ररत्न प्राप्त झाले. "शिवाजीराजे"नाव ठेवले व नंतर "शाहू" प्रचलित झाले.
१८ मे इ.स.१६८२
म्हैसुरच्या "चिकदेवराय" कडून मराठे पराभूत झाले पण 'मुदेरच्या नायकावर' मराठ्यांनी विजय मिळवला.

Saturday, 16 May 2020

🚩शिवविचार प्रतिष्ठान🚩
१७ मे इ.स.१६५६

छत्रपती शिवाजी महाराज उत्तर कोकणातील मोहिमेसाठी रवाना.
१७ मे इ.स.१६६६
१६ मे या दिवशी बादशाहाने आग्र्याच्या कैदेत असताना शिवरायांना ठार मारण्यासाठी शुजातखानाच्या नावाने फर्मान तयार करण्याचा हुकुम सोडला! त्याचे असे झाले की, औरंगजेबाचे काही महत्त्वाचे सरदार त्याची भेट घेण्यासाठी किल्ल्यात आले.त्यांचा मुद्दा एकच.या सीवाला ठार मारा.त्याने आपले अनेक अपराध केले आहेत. जहाँआरा बेगम ही बहीण.तिचा मुद्दा आणखीन वेगळा. 

ती म्हणत होती की,या सीवाने शाहिस्तेखानाची मुलगी पळविली. ती आपली मामेबहीण होती. याच सीवाने सुरतशहराचे मला मिळणारे जकातीचे उत्पन्न खलास करून टाकले. म्हणून याला ठार मारा. आणि खरोखरच औरंगजेबाने तिरीमिरीस यावे तसे येऊन म्हटले की, ' होय. मी सीवाला ठार मारणार आहे!' हा त्याचा अचानक व्यक्त झालेला निर्णय ऐकताच सर्वजण क्षणभर विस्मितच झाले. बादशाहाने फर्मान तयार करण्याचा हुकुम सोडला. हे एक प्रकारे किल्ल्यात अगदी गुप्तपणे चालू होते.पण आश्चर्य असे की , ही भयंकर गोष्ट रामसिंगला त्याचे घरी समजली. तो कमालीचा बेचैन झाला.त्याने तातडीने मिर्झा मोहम्मद अमीनखान मीरबक्षी या फार मोठ्या सरदाराकडे धाव घेतली. रामसिंगनेमीरबक्षीला कळवळून विनंती केली की , माझा अर्ज बादशाहांना आत्ताच्या आत्ता आपण जातीने जाऊनसादर करावा. मीरबक्षीने त्याची विनंती खरोखरच मान्य केली. रामसिंगने बादशाहासाठी अर्ज लगेचतयार केला. तो घेऊन मिर्झा किल्ल्यात गेला मग स्वत:च रामसिंग बादशाहाकडे का गेला नाही!त्याचे कारण बादशाहाची अशी अचानक भेट घेण्याचा अधिकार रामसिंगला नव्हता. तो चौथ्या दर्जाचा सरदार होता.
मीरबक्षीने बादशाहाला जातीने त्वरित भेटून रामसिंगचा अर्ज दिला. त्यात रामसिंगने असे म्हटले होते की,' आपण शिवरायांना ठार मारण्यासाठी फर्मान काढीत आहात. आपण सर्वशक्तीमान आहात.आपण राजांना ठार मारू शकता. पण आम्ही शिवाजीराजांना शपथपूर्वक सुरक्षिततेचा शब्द दिला आहे. हा राजपुतांचा शब्द आहे , तरी आपण राजांना ठार मारणार असाल तर प्रथम मला ठार मारा. मग शिवरायांना मारा. हा अर्ज पाहून बादशाह चपापलाच. त्यातील पहिली गोष्ट अशी की , सीवाला ठार मारण्यासाठी फर्मान तयार करण्यासंबंधीची बातमी येथून बाहेर पडलीच कशी ? रामसिंगला कळलीच कशी ? दुसरी गोष्टी अशी की , रामसिंग म्हणतो की , ' मला प्रथम ठार मारा. मग सीवाला ठार मारा ' याचा अर्थ असाहीउघडउघड दिसतोय की , मी जिवंत असेपर्यंत सीवाच्या अंगाला तुम्ही हात लावू शकत नाही. इथेच बादशाह चपापला. त्याने राजांना ठार मारण्यासंबंधीचे फर्मान थांबविले आणि मीरबक्षीला सांगितले की , ' रामसिंगला उद्या (दि. १७ मे) किल्ल्यात आम्हांस भेटावयास सांगा शिवरायांचे तातडीने मरण बादशाहाने पुढे ढकलले. दि. १७ मे रोजी रामसिंग किल्ल्यात दिवाण-इ-खासमध्ये बादशाहास भेटावयास गेला. बादशाह रामसिंगला म्हणाला, ' तुझा अर्ज मिळाला.मंजूर आहे. पण सीवा आमच्या परवानगीशिवाय आग्ऱ्यातून निघून जाणार नाही आणि कोणतेही घातपाती कृत्य करणार नाही अशी तू ग्वाही देतोस का ? तू या गोष्टीला जामीन राहतोस का ?प्रश्न भयंकरच अवघड होता. वादळाला जामीन राहण्यासारखेच होते हे. रामसिंग घरी आला. त्याने महाराजांना सर्व हकीकत सांगितली. महाराज ती ऐकून गंभीर झाले. बादशाहाचा आपल्याबाबतीतील डाव अगदी स्पष्ट झाला. महाराज शांतपणे उठले. त्यांनी रामसिंगबरोबर त्याच्या महालातील देवघरात प्रवेश केला. तेथील तुळसीबेल हातात घेतले. अन् देवाला वाहात त्यांनी रामसिंगला म्हटले ' भाईजी, तुम्हीबादशाहांना जमानपत्र लिहून द्या. मी जमानपत्राप्रमाणे वागेन. ' '

Friday, 15 May 2020

🚩 शिवविचार प्रतिष्ठान🚩
१६ मे इ.स.१६६५

"मुरारबाजी देशपांडे" यांना विरमरण.'दिलेरखानाने'पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर ५००० पठाण यांसह "सुलतानढवा" केला, हे पाहून "मुरारबाजी देशपांडे" यांनी ७०० मराठी सैन्यासोबत बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडून मोगलांवर चाल केली. भयंकर "रणधुमाळी" उडाली व "मुरारबाजीचा" आवेश व हल्ला असा विलक्षण होता कि जणू "सुदर्शन चक्र" पठाणांची खांडोळी उडवीत मुरारबाजीची ती 'प्रलयकारी झुंड' दिलेरखानाच्या रोखाने येऊ लागली. गर्दी उडाली "मुरारबाजीचा" हत्यारी सपाटा म्हणजे जणु "रुद्राचे संतप्त तांडव" होते ते शौर्य पाहून 'दिलेरखानाची' बोटे तोंडात गेली व त्याने 'लढाई' थांबवून मुरारबाजींना म्हणाले, "अय बहादूर ! तुम्हारी बहादुरी देखकर मे निहायत खुष हुवा हु ! तुम हमारे साथ चलो हम तुम्हारी शान रखेंगे !  पण फितुरीचे अमिष पाहताच त्या 'ईमानी' व 'स्वाभिमानी' मुरारबाजींचा संतापाने भडका उडाला व त्यांनी खुद्द खानावरच चाल केली तेव्हा खानाने सोडलेला 'तिर' वर्मी लागुन *"मुरारबाजी"* रणांगणावर कोसळले. मोर्यांच्या "शिरपेचातील" हा तुरा महाराजांना लाभला होता खानाचे 'फितुरीच्या अमिषाने' तोंडाला पाणी सुटण्याऐवजी त्यांच्या "तलवारीलाच" खानाच्या रक्ताचे पाणी सुटले.

Saturday, 9 May 2020

शिवविचार प्रतिष्ठान
१० मे इ.स.१८१८

"रायगडावर" इंग्रजांनी १ मे १८१८ रोजी हल्ला चढवला व त्याचे नेतृत्व करत होता 'क्याप्टन प्रॉथर', यावेळी गडाचा 'किल्लेदार' होता "अबुल फतेखान". आपल सारं बळ एकटवुन गडावरचा *"भगवा"* तो संभाळत होता, मराठे इंग्रजांना टक्कर देत होते पण अखेर आजच्या दिवशी १० मे १८१८ रोजी गडावर "दारुगोळ्याचा" प्रचंड स्फोट होवून सारा गड 'धडाडून' पडला. वर सुर्याची उन्हाळी 'आग', खालुन इंग्रजांची तोफबंदुकीची 'आग' आणी गडावरच्या 'आगीत' गड "होरपळुन" निघाला. इंग्रज अधिकारी "क्याप्टन प्रॉथर" गडात शिरला तेव्हा एका लहानग्या झुडपाच्या सावलीत १ "स्त्री" बसली होती...

 ती म्हणजे शेवटच्या बाजीराव पेशव्यांच्या पत्नी "श्रीमंत वाराणसी बाईसाहेब पेशवे". क्याप्टन प्रॉथर त्यांच्याशी 'अदबीने' व 'आदराने' वागला त्याने त्यांना "मेण्यात" बसवुन 'पुण्याकडे' रवाना केले.रायगडावर उरली फक्त "राख" सारे वाडे, राजसभा आणी जे होत नव्हत सारं जळुन खाक झालं आणी सर्वात जास्त जळालं ते १० दिवस गडाचं रक्षण करणार्या "अबुल फतेखानचं" आणी "मराठी सैनिकांचं" काळीज.
१० मे इ.स.१६३५
थोरले महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांचं वार्षिक उत्पन्न त्याकाळी २० लाख ७५ हजार होन असल्याचं विजापूरच्या आदीलशहाचं अधिकृत पत्र.
१० मे इ.स.१६५५
जावळीच्या खोऱ्यातील फीतुरी संपविण्यासाठी छत्रपती शिवराय जावळीमध्ये दाखल.
🚩शिवविचार प्रतिष्ठान🚩

९ मे इ.स.१५४०
#महाराणा_प्रताप_यांचा_जन्म
(मृत्यू – १९ जानेवारी १५९७)
गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र. प्रतापसिंह गुहिलोत ह्या नावाने हा राजस्थानात प्रसिद्ध आहे. उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते; परंतु प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले.
९ मे इ.स.१६६०
शास्ता उर्फ़ शाहिस्तेखान नगरवरुन निघून निरा नदीच्या काठाकाठाने मजल-दरमजल करत पुण्याला पोचला आणि त्याने लालमहालावर कब्जा केला. छत्रपती शिवाजीराजे त्यावेळी पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. तर मराठा फौज विजापुर प्रांतात धाडी घालण्यात आणि वेढा फोडण्यात व्यस्त होती.  ह्याचा फायदा घेउन खानाने पुणे - सासवड ताब्यात घेतले.
*९ मे इ.स.१६७४*
"राज्यभिषेक" होण्या आगोदर छत्रपती शिवाजी महाराज चिपळुण येथे पडलेल्या 'मराठ्यांच्या छावणीला' भेट देवुन व अधिकार्याला महत्वाच्या सुचना देवुन "रायगडावर" परतले.

Thursday, 7 May 2020

शिवविचार प्रतिष्ठान
७ मे इ.स.१६७४
छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर मुक्कामी
७ मे इ.स.१६८०
छत्रपती संभाजीराजेंच्या राजाभिषेकपूर्वी म्हणजेच इ.स. १६८० वैशाख वद्य ४ शके १६०२ च्या मुरगुडच्या रूद्राप्पा देसाईला पाठविलेल्या पत्रावर शंभूराजांची शोडशावली राजमुद्रा प्रथम आढळली भोसले घराण्यातील हि *शंभूराजांची राजमुद्रा छत्रपती शिवरायांच्या मुद्रेपेक्षा आकाराने वेगळी आहे. उभी पिंपळपाणी आकाराची सात ओळींची षोडशबुरजी दुव्सयती अशीहि राजमुद्रा स्वताची अस्मिता व रूबाब व्यक्त करते
 राजमुद्रेप्रमाणे त्यांची मर्यादा पण शिवरायांच्या मर्यादेपेक्षा एका अक्षराने वेगळी आहे.
७ मे इ.स.१६६०
पुण्याकडे निघालेल्या शाहीस्तेखानाच्या फौजेवर मराठ्यांनी अचानक गनिमी काव्याने हल्ला चढवला आणि त्यांची रसद लुटून नेली. यानंतर ४ दिवस खानाचं सैन्य उपाशी होतं
७ मे इ.स.१६८०
बहुजन विकासाची आस आणि सार्वत्रिक मुरगुडच्या रूद्राप्पा देसाई यास छत्रपती शिवरायांच्या काळात ठरल्याप्रमाणे खंडणी वसुल केली जाईल असा आदेश देणारे पत्र छत्रपती संभाजीराजेंनी पाठवले.