Sunday, 5 April 2020

शिवविचार प्रतिष्ठान
५ एप्रिल इ.स.१६६३

सुमारे २वर्षे लालमहालात ठाण मांडून बसलेल्या शाहिस्तेखानावर शिवरायांचा आकस्मिक छापा चैत्र शुद्ध अष्टमी म्हणजेच रामनवमीच्या आदल्या दिवशी आणि मुस्लिम लोकांच्या रोज्याच्या ६ व्या दिवशी धक्कादायक छापा खानकसाबसा पसार मात्र खानाची ३बोटे कापली जिवाच्या भीतीने खान तिकडून जो पळाला तो थेट औरंगाबादला जाउन थांबला 
५ एप्रिल इ.स.१७१८
मराठा सरखेल 'कान्होजी आंग्रे' यांच्या आरमाराला जशास तसे उत्तर देण्यासाठी सर्व तह बाजूला सारून ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे कौन्सिलच्या बैठकीत आंग्र्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला गेला.
 पुढे काही दिवसांनी इंग्रजांनी आंग्र्यांचे एक शिबाड पकडले तेंव्हा आंग्र्यांनी इंग्रजांना पत्र पाठवले. "तुमची आमची मैत्री संपली. इथून पुढे देवाची कृपा होउन माझ्या हाती जे लागेल ते घेतल्याशिवाय मी राहणार नाही."

Saturday, 4 April 2020

शिवविचार प्रतिष्ठान
४ एप्रिल इ.स.१६६३

छत्रपती शिवराय 'किल्ले सिंहगडावर दाखल असतांना मावळ्यांनी शाहिस्तेखानावर आक्रमण केले ४ एप्रिल इ.स.१६७०  नगरमध्ये मराठे घुसलेले पाहून 'दाऊदखान कुरेशी' हा खानदेशातून त्वरेने नगरास ७००० स्वारांसह आलेला होता.
नगरमध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात पळाले दाऊदखान त्यांच्यामागे हाथ धुवून पळत सुटला जुन्नर प्रांतातूनही मराठे तात्पुरते पळून गेले
मग मात्र दमलेला दाऊदखान नगरला परतला.

४ एप्रिल इ.स.१६७९
छत्रपती शिवरायांची विजापूरजवळ 'शहापूर' येथे स्वारी
४ एप्रिल इ.स.१६८३
छत्रपती शिवरायांपासून स्वराज्यात असलेला मुन्शी "काझी हैदर" फितूर झाला.

Friday, 3 April 2020

शिवविचार प्रतिष्ठान
*३ एप्रिल इ.स.१६८०*

(चैत्र शुध्द पौर्णिमा शके १६०२) *छत्रपती शिवरायांचे "राजधानी किल्ले रायगड" वर निधन* शौर्यधैर्य नितीमत्ता स्वातंत्र्य यांचा ओजस्वी स्त्रोत असलेले व गुलामीच्या साखळदंडात अडकलेल्या मानवाला मुक्त करण्यासाठी व ह्या भुतलावर सुवर्ण स्वराज्य निर्माण करणारे तुमचे आमचे नाही तर या सकल त्रैलौक्याचे पालनकर्ते तारणहार राजमान्य राजश्री अखंडलक्ष्मी अलंकृत महापराक्रमी महाप्रतापी महाराजाधिराज श्रीमंत *छत्रपती शिवाजी महाराज* हे सर्व स्वराज्याला पोरके करुन अनंतात विलीन झाले ज्यांच्या उपकारांची परतफेड आपण हजारो पिढ्या करु शकत नाही अशा या महामानवाला, युगपुरुषाला मानाचा त्रिवार मुजरा आणि विनम्र अभिवादन.
*३ एप्रिल इ.स.१६६२*
"मोरोपंत पिंगळे" हे आत्तापर्यंत "मुजुमदारी" हे पद सांभाळत होते.
छत्रपती शिवरायांनी त्यांची मुजुमदारी "निळोपंत सोनदेव" यांस दिली व "मोरोपंत पिंगळे" यांना "पेशवे" पद दिले.
*३ एप्रिल इ.स.१६६७*
आग्र्याहुन सुटका प्रकरणांतर औरंगजेब व "छत्रपती शिवराय" यांच्यात "युध्दबंदीचा" तह झाला.

Wednesday, 1 April 2020

शिवविचार प्रतिष्ठान
२ एप्रिल इ.स.१६७९

मुघल सरदार दिलेरखानाचा भूपाळगडावर कब्जा.
भूपाळगडावर "फिरंगोजी नरसाळा" हे किल्लेदार होते,
दिलेरखानने टेकडीवर तोफा चढवल्या व तोफांच्या माऱ्याने किल्ल्याचा बुरूज ढासळला आणि किल्ला एका प्रहरात मुघलांच्या हाती आला.
यानंतर शरण आलेल्या ७०० मराठ्यांचे हात या क्रूर दिलेरखानाने तोडले

२ एप्रिल इ.स.१६७९
औरंगजेबने मुघल राजवटीतील हिंदूंवर जिझीया कर लादला या करात मुस्लीम राजवटीत राहणाऱ्या हिंदूंवर केवळ २ पर्याय असत एक तर धर्मांतर करून इस्लामचा स्विकार करणे अथवा मृत्यू मात्र पुढील काळात अपवाद म्हणून जिझीया कर देऊन दुय्यम नागरीक म्हणून जगण्याची परवानगी दिली गेली या करात हिंदूंवर वेगवेगळ्या १७ अटी लादण्यात आल्या
२ एप्रिल इ.स.१७२०
छत्रपती शाहू महाराज(थोरले) यांचे विश्वासू सहकारी आणि मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे "बाळाजी विश्वनाथ" यांचे सासवड येथे निधन झाले.

Tuesday, 31 March 2020

शिवविचार प्रतिष्ठान

१ एप्रिल १६७३
मराठ्यांनी परळीचा किल्ला जिंकला.  पुढे शिवरायांनी आपल्या सद्गुरूस अर्थात समर्थ रामदास स्वामी महाराजांना या गडावर आदरपूर्वक बोलवून घेतले व गडाचे नाव ठेवले सज्जनगड.  सज्जनगडाच्या पायथ्याला परळी नावाचे गाव आहे. या गावावरूनच किल्ल्याचे नाव परळी असे पडले. या गावात २ अतिशय जीर्ण अशी मंदीरे आहेत. सुरेख. पण औरंगजेबाच्या हल्ल्यात त्या मंदीरांना उपद्रव झालेला आहे. मुंडी छाटलेला नंदी अजूनही मंदीरा समोर उभा आहे. पुर्वी अश्वलायन ऋषींनी या डोंगरावर तपश्चर्या केलेली होती. म्हणून डोंगराचे नाव पडले अश्वलायन दुर्ग मग या परळी गावावरून डोंगराचे नाव पडले परळीचा किल्ला। . मग छत्रपती शिवाजी महाराजांनी नाव ठेवले सज्जनगड. मग औरंगजेबाने जेंव्हा किल्ला जिंकला तेंव्हा त्याने नाव ठेवले ‘नवरसतारा’ पुन्हा मराठ्यांनी हा किल्ला जिंकून किल्ल्याचा ‘सज्जनगड’ म्हणून नामकरण विधी केला.

Monday, 30 March 2020


३१ मार्च १६६५

मिर्झा राजे जयसिंह व दिलेरखान पठाण पुरंदरच्या पायथ्याशी येऊन
दाखल. इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा वेढा सुरु. औरंगजेब बादशाहाच्या
फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या, तेव्हा बादशाहावर जबर
बसण्यासाठी शिवरायांनी खूप सधन सुरतेवर छापा घालून लक्षावधी
रुपयांची लुट मिळवली. औरंगजेब बादशाहाच्या सुरतेची शिवरायांनी
बेसुरत केली.त्यामुळे बादशाहा भयंकर चिडला होता.मराठ्यांचे राज्य
नष्ट करण्याचा त्याने निश्चय केला.मिझाराजे जयसिंग या आपल्या
बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले.त्याच्या सोबतीला
दिलेरखान हा आपला विश्वासू सरदार दिला.अलोट खजिना आणि
अफाट दारूगोळाही बरोबर दिला. #Ek_aathavan_shivrayanchi जयसिंग आणि दिलेरखान प्रचंड
फौजेसह दक्षिणेत येऊन पोहचले.स्वराज्यावर फार मोठे संकट आले.
पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता.हा किल्ला
घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही,हे दिलेरखान
जाणून होता.त्यामुळे दिलेरखानाने पुरंदरला
वेढा दिला.
🚩 *शिवविचार प्रतिष्ठान*🚩
३० मार्च इ.स.१६४५
नरसप्रभू देशपांडेंना आदिलशाही सुभेदाराचे धमकीवजा पत्र वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ वाहिली, रोहीडे व वेळवंड खोरे येथील देशपांडे, कुलकर्णी, दादाजी नरसप्रभू हे महाराजांच्या सोबत होते असे काही वतनदारांकडून कळल्यावर आदिलशहाच्या शिरवळ येथील सुभेदाराने त्यांना ३० मार्च १६४५ रोजी धमकीवजा पत्र पाठवले, या पत्रात दादाजी चिंतेत आहे हे कळताच राजांनी खालील पत्र पाठवले, " हे स्वराज्य व्हावे हि तो श्रींची इच्छा आहे " आपण सुरु केलेले कार्य हे ईश्वरी इच्छेनुसार आहे, हि धारणा त्यांनी या पत्रातून व्यक्त करून मनोबल वाढवले.
३० मार्च इ.स.१६५६
छत्रपती शिवराय 'जावळी' येथून रायरीकडे रवाना झाले.
३० मार्च इ.स.१६६५
मुघल सरदार 'मिर्झाराजे जयसिंग' आपल्या फोजेसह पुन्हा सासवडला आले.
३० मार्च इ.स.१७२९
मराठ्यांनी थोरले बाजीरावच्या नेतृत्वाखाली जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.
३० मार्च इ.स.१७५७
प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.