Thursday, 7 May 2020

शिवविचार प्रतिष्ठान
७ मे इ.स.१६७४
छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर मुक्कामी
७ मे इ.स.१६८०
छत्रपती संभाजीराजेंच्या राजाभिषेकपूर्वी म्हणजेच इ.स. १६८० वैशाख वद्य ४ शके १६०२ च्या मुरगुडच्या रूद्राप्पा देसाईला पाठविलेल्या पत्रावर शंभूराजांची शोडशावली राजमुद्रा प्रथम आढळली भोसले घराण्यातील हि *शंभूराजांची राजमुद्रा छत्रपती शिवरायांच्या मुद्रेपेक्षा आकाराने वेगळी आहे. उभी पिंपळपाणी आकाराची सात ओळींची षोडशबुरजी दुव्सयती अशीहि राजमुद्रा स्वताची अस्मिता व रूबाब व्यक्त करते
 राजमुद्रेप्रमाणे त्यांची मर्यादा पण शिवरायांच्या मर्यादेपेक्षा एका अक्षराने वेगळी आहे.
७ मे इ.स.१६६०
पुण्याकडे निघालेल्या शाहीस्तेखानाच्या फौजेवर मराठ्यांनी अचानक गनिमी काव्याने हल्ला चढवला आणि त्यांची रसद लुटून नेली. यानंतर ४ दिवस खानाचं सैन्य उपाशी होतं
७ मे इ.स.१६८०
बहुजन विकासाची आस आणि सार्वत्रिक मुरगुडच्या रूद्राप्पा देसाई यास छत्रपती शिवरायांच्या काळात ठरल्याप्रमाणे खंडणी वसुल केली जाईल असा आदेश देणारे पत्र छत्रपती संभाजीराजेंनी पाठवले.

Monday, 27 April 2020


🚩शिवविचार प्रतिष्ठान🚩
२७ एप्रिल इ.स.१६६६

घाटमाथा व कोकण यांच्या मध्यभागी उभा असलेला विजापूरकरांचा खेळणा उर्फ विशालगड स्वराज्यात दाखल करण्यासाठी महाराजांनी मावळ्यांना सुचना दिल्या. त्याप्रमाणे भारंभार माळा लावून खेळणागड स्वराज्यात दाखल केला. मावळ्यांनी बहु पराक्रम केला.

Saturday, 25 April 2020


🙏🏻शंभू महाराज
🙏🏻

पुरंदरी जन्म घेतला तुम्ही
छत्रपती शिवरायांच्या पुता
मुजरा करितो तुम्हाला
मातोश्री सईच्या सुता.

बालवयात होतात तुम्ही ज्ञानी
दुश्मनासही मागायला लावले पाणी
स्वभावाने होतात तुम्ही सच्चे
शूर आबांचे शूर बच्चे.

१२० लढाई न हार एकही
खेळलात तुम्ही गनिमी कावा
म्हणोनि तुम्हास म्हणतात सगळे
शूर आबांचा शूर छावा.

तुमच्या थोर पराक्रमामुळेच
वाढली रायगडाची शान
पाहोनिया तुमचा पराक्रम शंभू
औरंगजेब झाला होता परेशान.

छत्रपतींचे वंशज तुम्ही
देव तुमचे शिवाजी
तुम्हीच होतात या स्वराज्याचे
स्वराज्य रक्षक संभाजी.

स्वराज्यासाठी जगणे मरणे
शंभूराजे तुम्हाकडून शिकलो
मातीसाठी प्राण त्यागणे
हे सुध्दा तुम्हाकडूनच शिकलो.

याहूनही अजून काय लिहावे
सर्वदा ऐवढेच स्मरणावे
ना भूतो: ना भविष्यती राजा.
छत्रपती श्री शिवाजी राजा.
छत्रपती श्री संभाजी राजा.
   👇✒अतुल मोरे_

Tuesday, 21 April 2020

शिवविचार प्रतिष्ठान

२१ एप्रिल इ.स.१६५७
वीर मुरारबाजी देशपांडे स्वराज्यात दाखल झाले.
२१ एप्रिल इ.स.१६६८
छत्रपती शिवरायांनी विठोजी हैबतराव यास अभय दिले.
२१ एप्रिल इ.स.१७००
सातारा शहरातील किल्ले अजिंक्यतारा या किल्ल्यावर मुठभर मराठ्यांच्या मदतीने किल्लेदार प्रयागजींनी तब्बल साडेचार महीने औरंगजेबाशी झुंज दीली आणि अखेर गडावरचा दारूगोळा आणि इतर कुमक संपली.

Saturday, 18 April 2020

शिवविचार प्रतिष्ठान

१८ एप्रिल इ.स.१६७४

सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या युद्धभूमीवरील मृत्यूनंतर छत्रपती शिवरायांनी हंबीरराव मोहीते यांना स्वराज्याचे सरसेनापती केले
१८ एप्रिल इ.स.१६७७
छत्रपती शिवराय आग्रा कैदेत असताना त्यांचे अत्यंत जवळचे साथीदार त्र्यंबक सोनदेव डबीर यांचे निधन
१८ एप्रिल इ.स.१७०३
महत् प्रयासाने औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला. गडाची व्यवस्था लावण्यात आणि पावसाळा संपायची वाट बघत तो तिकडेच ठाण मांडून बसला. पावसाळा संपला की राजगडकडे कूच करायचा त्याचा मनसुबा होता.
१८ एप्रिल इ.स.१७७४
पेशवे सवाई माधवराव यांचा किल्ले पुरंदरवर जन्म.
हे मराठा साम्राज्याचे पेशवा अर्थात पंतप्रधान होते. रघुनाथराव पेशव्यांच्या कारस्थानातून हत्या झालेल्या पेशवा नारायणराव यांचे ते पुत्र होते.

Tuesday, 14 April 2020

शिवविचार प्रतिष्ठान 
१५ एप्रिल इ.स.१६६७

"छत्रपती शिवराय" आणि "पुतळाबाई" साहेबांशी यांचा विवाह झाला 
१५ एप्रिल इ.स.१६७३
स्वराज्याचे सरसेनापती सरनोबत प्रतापराव गुजर यांनी बेहलोलखानाला शरण आला म्हणून विजापूरच्या दिशेने परत सोडून दिले आणि इथूनच सुरूवात झाली एका नव्या वादळाची. छत्रपती शिवरायांनी प्रतापराव गुजरांना कडक शब्दात सुनावले,
"सरनोबत असूनही कोणता न्याय केलात? हाती आलेल्या गिनिमाला सोडून दिले? गनिमास धूळ चारल्याशिवाय आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका छत्रपती शिवरायांचे शब्द म्हणजे अंगार होते. 
एखाद्या निखाऱ्याप्रमाणे ते शब्द प्रतापरावांच्या कानात घुसले.
प्रतापरावांचा विजयाचा आनंद क्षणात मावळला व बेहलोलखानाला पुन्हा पकडण्यासाठी ते नव्या जोमाने योजना आखू लागले.
१५ एप्रिल इ.स.१७३९
वसईच्या किल्ल्यावरील मराठ्यांच्या हल्ल्यामध्ये पोर्तुगीज ॲाफीसर "पिंटो" व "सिलवेरा" यांचा मृत्यू.

शिवविचार प्रतिष्ठान
१४ एप्रिल इ.स.१६७३


छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून रायगडावर परत आले.
१४ एप्रिल इ.स.१६६४
जसवंतसिंह राठोड याने किल्ले सिंहगड वर सुलतानढवा हा लढाई प्रकार केला. त्याने केलेला हा हल्ला मराठ्यांनी उधळून लावला व महाराजा जयवंतसिंहाला पळवून लावला
१४ एप्रिल इ.स.१६६५
ऐतिहासिक किल्ले पुरंदर च्या वेढ्यामध्ये दिलेरखान, अब्दुल्ला व महेली या मुघलांनी ३ तोफांच्या साहाय्याने किल्ले वज्रगड जिंकला. 
किल्ले वज्रगड हा पुरंदरच्या शेजारीच पुरंदरला लागून एक लहान किल्ला आहे.
१४ एप्रिल इ.स.१८९१
दलितांच्या हक्कासाठी लढणारे, दलितांना न्याय मिळवून देणारे आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाची म्हणजेच स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहीणारे

"भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर" यांचा जन्म.