Saturday, 18 April 2020

शिवविचार प्रतिष्ठान

१८ एप्रिल इ.स.१६७४

सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या युद्धभूमीवरील मृत्यूनंतर छत्रपती शिवरायांनी हंबीरराव मोहीते यांना स्वराज्याचे सरसेनापती केले
१८ एप्रिल इ.स.१६७७
छत्रपती शिवराय आग्रा कैदेत असताना त्यांचे अत्यंत जवळचे साथीदार त्र्यंबक सोनदेव डबीर यांचे निधन
१८ एप्रिल इ.स.१७०३
महत् प्रयासाने औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला. गडाची व्यवस्था लावण्यात आणि पावसाळा संपायची वाट बघत तो तिकडेच ठाण मांडून बसला. पावसाळा संपला की राजगडकडे कूच करायचा त्याचा मनसुबा होता.
१८ एप्रिल इ.स.१७७४
पेशवे सवाई माधवराव यांचा किल्ले पुरंदरवर जन्म.
हे मराठा साम्राज्याचे पेशवा अर्थात पंतप्रधान होते. रघुनाथराव पेशव्यांच्या कारस्थानातून हत्या झालेल्या पेशवा नारायणराव यांचे ते पुत्र होते.

No comments:

Post a Comment