शिवविचार प्रतिष्ठान
१३ एप्रिल इ.स.१६६३
नुकत्याच जिंकलेल्या कोकणातील प्रदेशात एक दौड मारून पावसाळ्याच्या मोहीमेची आखणी करण्याकरता छत्रपती शिवराय "किल्ले राजगड" हून कोकणात उतरले व "कुडाळ" पर्यंत गेले
१३ एप्रिल इ.स.१६६५
किल्ले पुरंदर चा लहान भाऊ अशी ओळख असलेला किल्ले वज्रगड चे तट बुरूज पडले.
१३ एप्रिल इ.स.१७००
स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू होऊन महिना झाला तरी औरंगजेब बादशहास साताऱ्यातील "किल्ले अजिंक्यतारा" दाद देत नव्हता.
१३ एप्रिलच्या पहाटे मुघलांनी किल्ल्याच्या तटाखाली २ भुयारे खणली व त्यात सुरुंग पेरुन त्यास बत्ती दिली. एक सुरुंग फुटला व अनेक "मराठे" त्याखाली गाडले गेले.
प्रयागजी सुद्धा अडकले पण सुदैवाने त्यात बचावले.
तट पडल्याच्या आनंदात अनेक मुघल गड चढून वर येऊ लागले आणि अचानक दुसरा सुरुंग फुटला व तट चढणार हजारो मुघल त्याखाली गाडले गेले.
आधीच आत आलेल्या मुघल सैन्यावर मराठे तुटून पडले व त्यांना कापुन काढले.
१३ एप्रिल इ.स.१७०४
"किल्ले संग्रामदुर्ग" उर्फ "चाकणचा किल्ला" सोडून औरंगजेब खेड(राजगुरुनगर) कडे निघाला.
१३ एप्रिल इ.स.१७३१
सातारा गादीचे "छत्रपती शाहू महाराज(थोरले)" व कोल्हापूर गादीचे "छत्रपती संभाजी महाराज(दुसरे) यांच्यात राज्याच्या सिमेवरुन वाद.
No comments:
Post a Comment