Monday, 6 April 2020

शिवविचार प्रतिष्ठान

६ एप्रिल इ.स.१६५६
छत्रपती शिवरायांनी रायरीला ('किल्ले रायगड') वेढा टाकला.
६ एप्रिल इ.स.१६६३
छत्रपती शिवरायांनी पहाटेच्या सुमारास लाल महालातील शाहिस्तेखानाची तीन बोटे छाटली
६ एप्रिल इ.स.१६६६
 छत्रपती शिवराय आग्रा भेटीसाठी निघाले असता औरंगजेबचे त्यांना स्वागतपर पत्र "हंडीया" या ठिकाणी मिळाले.
६ एप्रिल इ.स.१७५५
पेशव्यांच्या सांगण्यावरून इंग्रजांनी स्वराज्याचे आरमारप्रमुख "तुळाजी आंग्रे" यांच्याकडून 'किल्ले फत्तेगड' आणि 'किल्ले कनकदुर्ग' हे जिंकून घेतले. २२ मार्च १७५५ रोजी झालेल्या इंग्रज व पेशवे यांच्यातील तहाप्रमाणे इंग्रज नौदल मराठा नौदलावर म्हणजेच तुळाजी आंग्रेंवर 'किल्ले सुवर्णदुर्ग' वर स्वारी करण्यासाठी मुंबईहून निघाले होते.

No comments:

Post a Comment