Tuesday, 14 April 2020


शिवविचार प्रतिष्ठान
१४ एप्रिल इ.स.१६७३


छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून रायगडावर परत आले.
१४ एप्रिल इ.स.१६६४
जसवंतसिंह राठोड याने किल्ले सिंहगड वर सुलतानढवा हा लढाई प्रकार केला. त्याने केलेला हा हल्ला मराठ्यांनी उधळून लावला व महाराजा जयवंतसिंहाला पळवून लावला
१४ एप्रिल इ.स.१६६५
ऐतिहासिक किल्ले पुरंदर च्या वेढ्यामध्ये दिलेरखान, अब्दुल्ला व महेली या मुघलांनी ३ तोफांच्या साहाय्याने किल्ले वज्रगड जिंकला. 
किल्ले वज्रगड हा पुरंदरच्या शेजारीच पुरंदरला लागून एक लहान किल्ला आहे.
१४ एप्रिल इ.स.१८९१
दलितांच्या हक्कासाठी लढणारे, दलितांना न्याय मिळवून देणारे आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाची म्हणजेच स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहीणारे

"भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर" यांचा जन्म.

No comments:

Post a Comment