Tuesday, 14 April 2020

शिवविचार प्रतिष्ठान 
१५ एप्रिल इ.स.१६६७

"छत्रपती शिवराय" आणि "पुतळाबाई" साहेबांशी यांचा विवाह झाला 
१५ एप्रिल इ.स.१६७३
स्वराज्याचे सरसेनापती सरनोबत प्रतापराव गुजर यांनी बेहलोलखानाला शरण आला म्हणून विजापूरच्या दिशेने परत सोडून दिले आणि इथूनच सुरूवात झाली एका नव्या वादळाची. छत्रपती शिवरायांनी प्रतापराव गुजरांना कडक शब्दात सुनावले,
"सरनोबत असूनही कोणता न्याय केलात? हाती आलेल्या गिनिमाला सोडून दिले? गनिमास धूळ चारल्याशिवाय आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका छत्रपती शिवरायांचे शब्द म्हणजे अंगार होते. 
एखाद्या निखाऱ्याप्रमाणे ते शब्द प्रतापरावांच्या कानात घुसले.
प्रतापरावांचा विजयाचा आनंद क्षणात मावळला व बेहलोलखानाला पुन्हा पकडण्यासाठी ते नव्या जोमाने योजना आखू लागले.
१५ एप्रिल इ.स.१७३९
वसईच्या किल्ल्यावरील मराठ्यांच्या हल्ल्यामध्ये पोर्तुगीज ॲाफीसर "पिंटो" व "सिलवेरा" यांचा मृत्यू.

No comments:

Post a Comment