Tuesday, 14 April 2020


शिवविचार प्रतिष्ठान
१४ एप्रिल इ.स.१६७३


छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून रायगडावर परत आले.
१४ एप्रिल इ.स.१६६४
जसवंतसिंह राठोड याने किल्ले सिंहगड वर सुलतानढवा हा लढाई प्रकार केला. त्याने केलेला हा हल्ला मराठ्यांनी उधळून लावला व महाराजा जयवंतसिंहाला पळवून लावला
१४ एप्रिल इ.स.१६६५
ऐतिहासिक किल्ले पुरंदर च्या वेढ्यामध्ये दिलेरखान, अब्दुल्ला व महेली या मुघलांनी ३ तोफांच्या साहाय्याने किल्ले वज्रगड जिंकला. 
किल्ले वज्रगड हा पुरंदरच्या शेजारीच पुरंदरला लागून एक लहान किल्ला आहे.
१४ एप्रिल इ.स.१८९१
दलितांच्या हक्कासाठी लढणारे, दलितांना न्याय मिळवून देणारे आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाची म्हणजेच स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहीणारे

"भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर" यांचा जन्म.

Sunday, 12 April 2020



शिवविचार प्रतिष्ठान
१३ एप्रिल इ.स.१६६३

नुकत्याच जिंकलेल्या कोकणातील प्रदेशात एक दौड मारून पावसाळ्याच्या मोहीमेची आखणी करण्याकरता छत्रपती शिवराय "किल्ले राजगड" हून कोकणात उतरले व "कुडाळ" पर्यंत गेले
१३ एप्रिल इ.स.१६६५
किल्ले पुरंदर चा लहान भाऊ अशी ओळख असलेला किल्ले वज्रगड चे तट बुरूज पडले.
१३ एप्रिल इ.स.१७००
स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू होऊन महिना झाला तरी औरंगजेब बादशहास साताऱ्यातील "किल्ले अजिंक्यतारा" दाद देत नव्हता.
१३ एप्रिलच्या पहाटे मुघलांनी किल्ल्याच्या तटाखाली २ भुयारे खणली व त्यात सुरुंग पेरुन त्यास बत्ती दिली. एक सुरुंग फुटला व अनेक "मराठे" त्याखाली गाडले गेले.
प्रयागजी सुद्धा अडकले पण सुदैवाने त्यात बचावले.
तट पडल्याच्या आनंदात अनेक मुघल गड चढून वर येऊ लागले आणि अचानक दुसरा सुरुंग फुटला व तट चढणार हजारो मुघल त्याखाली गाडले गेले.
आधीच आत आलेल्या मुघल सैन्यावर मराठे तुटून पडले व त्यांना कापुन काढले.
१३ एप्रिल इ.स.१७०४
"किल्ले संग्रामदुर्ग" उर्फ "चाकणचा किल्ला" सोडून औरंगजेब खेड(राजगुरुनगर) कडे निघाला.
१३ एप्रिल इ.स.१७३१
सातारा गादीचे "छत्रपती शाहू महाराज(थोरले)" व कोल्हापूर गादीचे "छत्रपती संभाजी महाराज(दुसरे) यांच्यात राज्याच्या सिमेवरुन वाद.

Thursday, 9 April 2020


शिवविचार प्रतिष्ठान
 १० एप्रिल इ.स.१६६२

छत्रपती शिवाजी महाराजांनी आई तुळजा भवानी देवीची प्रतिष्ठापना केली
१० एप्रिल इ.स.१६६०
राजापूरला इंग्रजांची  छत्रपती शिवरायांनी पळता भुई थोडी केली असूनही पन्हाळा किल्ल्याला टाकलेल्या वेढ्यात इंग्रज मिसळले व गडावर महाराजांच्या विरोधात तोफा डागू लागले 
१० एप्रिल इ.स.१६९३
१६८९ मध्ये राजधानी "किल्ले रायगड" मोगलांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांचे ३ रे छत्रपती राजाराम महाराज जिंजी येथे गेले व स्वःतचा राज्याभिषेक करवुन स्वराज्याची सुत्रे काही काळ तिकडुनच पाहिली,
याचदरम्यान १० एप्रिल १६९३ रोजी कोल्हापुर गादीचे "शहाजीराजे" (दुसरे) यांची भेट घेतली.

Wednesday, 8 April 2020



शिवविचार प्रतिष्ठान
९ एप्रिल इ.स.१६८२

मुघल सरदार शहाबुद्दीनचा  किल्ले रामशेज ला पुन्हा वेढा टाकण्याचा प्रयत्न पण किल्लेदार 'रामाजी पवार' व इतर मावळ्यांचा त्यांच्यावर जोरदार हल्ला 
९ एप्रिल इ.स.१६३३
मुघल बादशहा शहाजहानच्या फौजांनी निजामशाही विरूद्ध त्यांच्या देवगिरी किल्ल्यावर हल्ला चढविला 
९ एप्रिल इ.स.१६६९
उत्तर हिंदुस्तानातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेबकडून विशेय फौजा तैनात सुर्यग्रहण आले या सुर्यग्रहणाच्या मुहुर्तावर काशी काशी विश्वेश्वराचे देवालय जमीनदोस्त करण्याचा हुकूम बादशहाने सोडला या हुकूमाने जणू निसर्गच थरारला होता.

Tuesday, 7 April 2020

शिवविचार प्रतिष्ठान
८ एप्रिल इ.स.१६७४

चिपळून येथे छत्रपती शिवरायांनी मराठी लष्कराची पाहणी केली. राजाभिषेकपूर्वी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या युद्धभूमीवरील मृत्यूमुळे स्वराज्याचे सरसेनापतीपद हंबीरराव मोहीते यांना दिले.
८ एप्रिल इ.स.१६५७
२७ वर्षीय छत्रपती शिवरायांचा जाधवराव घराण्यातील काशीबाई यांच्याशी विवाह झाला.
८ एप्रिल इ.स.१६६६
छत्रपती शिवरायांनी लाल महालात केलेल्या हल्ल्यात कसाबसा वाचला. आणि औरंगजेब बादशहाचा मामा आणि मुघल सरदार शाहीस्तेखान पुणे परगणा सोडून औरंगाबादला पळून गेला.
८ एप्रिल इ.स.१६७५
छत्रपती शिवरायांचा गोव्यातील किल्ले फोंडा ला वेढा.
८ एप्रिल इ.स.१६७८
दक्षिण दिग्विजय मोहीम जिंकून छत्रपती शिवरायांचे किल्ले पन्हाळा येथे आगमन.


शिवविचार प्रतिष्ठान
७ एप्रिल इ.स.१६७७
छत्रपती शिवराय
श्री शैल्यम येथे पोहोचले
७ एप्रिल इ.स.१८१८
"दख्खन" ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहूतेक सर्वच किल्ल्यांची तोडफोड केली.आजच्या दिवशी कोकणातील सिंधुदुर्ग जवळील "किल्ले देवगड" हा विनाप्रयास इंग्रजांच्या ताब्यात गेला.

Monday, 6 April 2020

शिवविचार प्रतिष्ठान

६ एप्रिल इ.स.१६५६
छत्रपती शिवरायांनी रायरीला ('किल्ले रायगड') वेढा टाकला.
६ एप्रिल इ.स.१६६३
छत्रपती शिवरायांनी पहाटेच्या सुमारास लाल महालातील शाहिस्तेखानाची तीन बोटे छाटली
६ एप्रिल इ.स.१६६६
 छत्रपती शिवराय आग्रा भेटीसाठी निघाले असता औरंगजेबचे त्यांना स्वागतपर पत्र "हंडीया" या ठिकाणी मिळाले.
६ एप्रिल इ.स.१७५५
पेशव्यांच्या सांगण्यावरून इंग्रजांनी स्वराज्याचे आरमारप्रमुख "तुळाजी आंग्रे" यांच्याकडून 'किल्ले फत्तेगड' आणि 'किल्ले कनकदुर्ग' हे जिंकून घेतले. २२ मार्च १७५५ रोजी झालेल्या इंग्रज व पेशवे यांच्यातील तहाप्रमाणे इंग्रज नौदल मराठा नौदलावर म्हणजेच तुळाजी आंग्रेंवर 'किल्ले सुवर्णदुर्ग' वर स्वारी करण्यासाठी मुंबईहून निघाले होते.